『ॲग्री अनप्लग्ड | Agri Unplugged』のカバーアート

ॲग्री अनप्लग्ड | Agri Unplugged

ॲग्री अनप्लग्ड | Agri Unplugged

著者: Sakal Media
無料で聴く

このコンテンツについて

ॲग्री अनप्लग्ड हे ॲग्रोवनचं नवं कोरं पॉडकास्ट आहे. ॲग्रोवन शेतमार्केट या पॉडकास्टला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आम्ही हे नवीन पॉडकास्ट घेऊन येत आहोत. ॲग्री अनप्लग्ड या पॉडकास्टमध्ये तुम्हाला शेती क्षेत्रातल्या काही हटके आणि अनवट विषयांचा खजिना सापडेल. शेतीतलं नवं संशोधन, मॉन्सून, बदलता गावगाडा, शेतकऱ्यांच्या कथा-व्यथांपासून ते रंजक किश्श्यांपर्यंत कोणताही विषय वर्ज्य नाही. आंतरराष्ट्रीय खात्याचे शास्त्रज्ञ डॉ. आनंद कर्वे, पत्रकार व लेखक महारूद्र मंगनाळे, आयएएस अधिकारी व लेखक शेखर गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांच्यासह अनेक दिग्गजांच्या लेखणीतून उतरलेला दर्जेदार कन्टेन्ट या माध्यमातून नव्या रूपात ऐकायला मिळणार आहे. गेल्या १७ वर्षांपासून शेतकऱ्यांना अचूक, उपयुक्त आणि निर्णयक्षम माहिती देणारे ॲग्रोवन शेतकऱ्यांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणून जनमानसात रूजले आहे. ॲग्रोवनच्या डिजिटल अवतारामुळे तर ही ओळख आणखीनच उजळून निघाली आहे. वेबसाईट, व्हिडिओ, ॲप, पॉडकास्ट या सगळ्या आघाड्यांवर ॲग्रोवन दमदार कामगिरी करत आहे. त्यातलंच एक पुढचं पाऊल म्हणजे ॲग्री अनप्लग्ड.

政治・政府 政治学 社会科学
エピソード
  • Trailer
    2022/12/18
    1 分

ॲग्री अनप्लग्ड | Agri Unpluggedに寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。