-
サマリー
あらすじ・解説
Send us a text
भवनाथ म्हणजे तलेटी, येथील दुधेश्वर शिवमंदिरापासून प्रदक्षिणेला सुरूवात करतात. गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेऊन त्याला प्रदक्षिणा घालणे यालाच परिक्रमा करणे असे म्हणतात. पुरातन काळापासून सदर परिक्रमा चालू आहे
गिरनारच्या भोवतीने पूर्ण जंगल आहे. जे सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अखत्यारीत आहे.
वर्षभर आपल्याला या जंगलात प्रवेश मिळत नाही;
फक्त या परिक्रमेच्या कालावधीत ५ दिवस सर्वांसाठी प्रवेश मिळतो.
या जंगलात मुंगी, विंचू या पासून अगदी सिंहा पर्यंत भरपूर प्राणी आहेत, पण या ५ दिवसात हे प्राणी आपल्याला काहीही त्रास देत नाहीत. ही दत्तगुरूंचीच कृपा आहे.
देव आणि त्यांचे गण हे सुध्दा या कालावधीत परिक्रमेसाठी येतात आणि परिक्रमा करतात अशी आख्यायिका आहे.