エピソード

  • # 1556: जो दुसऱ्यावरी विसंबला. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    2024/09/17

    जो दुसऱ्यावरी विसंबला| त्याचा कार्यभाग बुडाला | जो आपणचि कष्टत गेला| तोचि भला ||
    असे समर्थ रामदास स्वामी का सांगतात?
    ही छोटीशी गोष्ट ते खूप छान समजावते.
    चिमणी रोजच्याप्रमाणे आपल्या इवल्याशा चोचीतून पिलांसाठी दाणे घेऊन घरट्यात आली. पिल्लं उदास होती. चिमणीने विचारले, काय झाले, तुम्ही उदास का? पिल्लं म्हणाली, 'आई, शेतकरी आला होता, तो सांगत होता, ‘उद्या त्याची मुलं येऊन झाडाची कापणी करणार आहेत. मग आपण बेघर होऊ, याच विचाराने आम्ही उदास आहोत!' चिमणी म्हणाली, 'काळजी करू नका पिलांनो, उद्या कोणी येणार नाही. तुम्ही अगदी निश्चिन्त राहा.' दुसऱ्या दिवशी खरोखरच, कोणीच आले नाही.

    続きを読む 一部表示
    5 分
  • # 1576: प्रगतीपथावरचे तारतम्य. लेखिका नीलिमा जोशी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    2024/09/16

    "online सामान घरी येते खरे, पण
    पण तुमच्या सोयीच्या वेळेनुसार येतं का?
    कधी भाजी फोडणीला टाकत असतो, कधी wash room मधे असतो, कधी पूजा करीत असतो, कधी वाचत असतो, आणि सामान येतं. दार उघडा!,"
    "OTP दिल्या शिवाय मिळत नाही
    मग फोन शोधा.
    लिस्ट प्रमाणे चेक करा.
    यात वेळ तर जातोच ना?"
    तो सुद्धा तुमच्या मनाविरुद्द,आणि गैरसोयीचा.
    मग आपल्या सोयीने, वेळ काढून का नाही बाजारातून आणायचं.?"

    続きを読む 一部表示
    7 分
  • # 1575: हत्तींशी बोलणारा माणूस. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    2024/09/16

    प्रसंगानुरूप हत्तींचं वर्तन कसं असतं, हे मीच काढलेल्या छायाचित्रांचे पुन्हा पुन्हा निरीक्षण करताना माझ्या लक्षात येऊ लागलं. त्यांची एकमेकांशी संवादाची भाषा, त्यांच्या भाव-भावना, हत्तीच्या पिलांची भाषा, हे मी प्रत्यक्ष हत्तींच्या निरीक्षणातून शिकलो. माणसामध्ये जसे वेगवेगळे स्वभावधर्म आहेत, तसे हत्तींमध्येही राग, लोभ, मोह, माया, मत्सर, आनंद आणि भीती असे भाव असतात, हे लक्षात आले. मग मला त्यांच्याशी संवाद साधणं सोपं झालं.

    続きを読む 一部表示
    10 分
  • # 1573: जे. एन. टाटांना विवेकानंदांचा मौलिक सल्ला. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    2024/09/14

    त्यावर विचार करत स्वामी विवेकानंद म्हणाले, "ठीक आहे, सर, या पोत्यांमध्ये जरी लोहयुक्त माती असली तरी, जर्मन लोक तुम्हाला सत्य सांगतील यावर तुमचा विश्वास आहे का?? तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की कोणत्याही युरोपीय राष्ट्राला मजबूत/ पोलाद उत्पादनात श्रीमंत/ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र भारत पाहण्याची इच्छा नाही.
    ही माती बहुधा लोह-खनिजाने समृद्ध असेलही. परंतु दुर्दैवाने हे पण सत्य आहे की तुम्हाला संपूर्ण युरोपमधे तपासण्या करून घेतल्या तरी तुमच्या हाती काय लागेल? अविश्वास आणि निराशावादी प्रतिक्रिया. कि, "सॅारी, ही माती अगदीच निरुपयोगी आहे लोह मिळवण्यासाठी."

    続きを読む 一部表示
    6 分
  • # 1572: 'गौरीमाय' ला निरोप लेखिका नीता चंद्रकांत कुलकर्णी कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    2024/09/13

    "गौरी माय तू यायच्या आधीच आम्हाला शहाणं केलं होतंस..
    त्यामुळे आम्ही अन्न वाया नाही घालवलं..
    घरचे पण आनंदित झाले.
    हळूहळू जमेल तसा थोडा थोडा बदल करत आहेत.
    रूढी ,परंपरा ,रीती ,रिवाज यांचे दडपण आहे.
    काय होतं आई खरं सांगू का ... बदल केला आणि काहीतरी विपरीत घडलं की वाटतं
    आपण बदल केला म्हणूनच हे असं झाल. लगेच मनात संशय येतो देवी किंवा देव आपल्यावर कोपला तर नसेल?"...

    続きを読む 一部表示
    5 分
  • # 1571: "माझी गौरीमाय." लेखिका निता चंद्रकांत कुलकर्णी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    2024/09/13

    गौरी माय म्हणाली, "पण खूप काम करून दमून नको जाऊस.....सण साजरा करताना त्यातला आनंद घ्यायला शिक.
    आता लेकी बाळी नोकरी करणाऱ्या आहेत.
    त्याचं घराची खरी लक्ष्मी आहेत हे विसरू नकोस...
    त्या आनंदात असतील तर घर सुखात असतं...
    हे केलंच पाहिजे.. ते केलंच पाहिजे... असं म्हणत बसू नकोस .
    काही बदल करताना मनात भीती नको ग ठेवूस... माझ्यावर प्रेम करतेस ना मग मला भ्यायचं कशाला ?"

    続きを読む 一部表示
    5 分
  • # 1570: देव नदीत बुडण्या पासून स्वतःला वाचवू शकतात का? (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    2024/09/12

    घरात काही चांगलं झालं की आईचं ठरलेलं वाक्य ‘देवाची कृपा’..!
    रागाच्या भरात त्यांनी देवघरातून सगळे देव उचलले आणि पिशवीत भरले.. भरकन गाडी काढली आणि एकटेच निघाले नदीच्या दिशेने...विसर्जन करायला.
    " बघू हिचे देव स्वतःचं तरी रक्षण करू शकतात का?नदीत बुडण्यापासून स्वतःला वाचवू शकतात का?" ते म्हणाले.

    続きを読む 一部表示
    8 分
  • # 1569: असेही गौरी-पूजन '. लेखिका सौ सुजाता लेले. कथन( मीनल भडसावळे )
    2024/09/10

    गौरी -पूजन आपल्या जिव्हाळ्याच. गणेशासोबत गौरीमाता घरी येते.नेहमीच्या आरासीबरोबर सरस्वतीमातेच्या बक्षिसांची आरास मांडण्याची एक नवीन कल्पना ह्या गोष्टीत मांडली आहे.

    続きを読む 一部表示
    4 分